उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेला स्मार्ट डिजिटल बोर्ड व प्रयोगशाळा साहित्य भेट

पुरंदर रिपोर्टर लाईव्ह │ 


सोमेश्वरनगर.   प्रतिनिधी




उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेला हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड विवो कंपनी पुणे यांच्या सीएसआर फंडातून व उर्मी फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट डिजिटल बोर्ड व प्रयोगशाळेचे साहित्य भेट म्हणून देण्यात आले.


या कार्यक्रमाला शिवकांत चव्हाण (फायनान्स मॅनेजर), सौम्या बक्षी (एच आर मॅनेजर), रोहित वाकाळे (असिस्टंट एच.आर. व सीएसआर कॉर्डिनेटर), राहुल शेंडे (उर्मी फाउंडेशन प्रमुख), रोहन शहा (डिस्ट्रीब्यूटर एमडी, बारामती), वैभव पोरे (सामाजिक कार्यकर्ते, म्हसवड), नितीन मांगवे (एरिया सेल्स मॅनेजर), रोहन शेरकर (शिवराज कम्युनिकेशन), अजिंक्य सावंत (अध्यक्ष समर्थ ज्ञानपीठ व ग्रामविकास संघटना वाघळवाडी), बी.एम. गायकवाड (उपाध्यक्ष), श्रीमती रोहिणी सावंत (संचालिका), शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब मोटे, पत्रकार विजय लकडे तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व मान्यवरांच्या स्वागताने झाली. यावेळी शाळेतील विद्यार्थी युवराज कोळपे, सोनम बरकडे व भरतकुमार नरके यांनी डिजिटल बोर्डचा वापर व शिक्षणातील महत्त्व याबाबत माहिती सादर केली.


मुख्याध्यापक बाळासाहेब मोटे यांनी प्रास्ताविकात शाळेची वाटचाल, गुणवत्तेत झालेली वाढ व माजी विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील योगदान याची माहिती दिली. विवो कंपनीच्या HR मॅनेजर यांनी सीएसआर फंडातून अशा शाळांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा उद्देश डिजिटल शिक्षण व दुर्बल घटकातील मुलांच्या प्रगतीसाठी असल्याचे सांगितले.


अजिंक्य सावंत यांनी संस्थेला मिळालेल्या या भेटीबद्दल समाधान व्यक्त करत, “स्मार्ट डिजिटल बोर्ड व प्रयोगशाळा साहित्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा मिळेल,” असे मत व्यक्त केले. त्यांनी विवो कंपनी व उर्मी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा आभार मानला. त्यांच्या हस्ते संस्थेचे प्रमाणपत्र देऊन दोन्ही संस्थांचा सन्मानही करण्यात आला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश वावरे यांनी केले तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.



Post a Comment

0 Comments